नमस्तुभ्यम्...!

सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स, मुंब

   स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजेच 'दादा' यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वाध्याय परिवार सज्ज झालाय. २० डिसेंबर २०१० रोजी जगभरातील ८ लाख 'स्वाध्यायी' नवी मुंबई येथील तळोजा एमआयडीसी मैदानात एकत्र येत आहे. कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्याच्या या कार्यक्रमाचे नाव आहे नमस्तुभ्यम्”...!  



     भ्रांत-ईश्वरवादाच्या भोव-यात फसलेला, अंधश्रध्देमध्ये अडकलेला, व्यसनांनी गुरफटलेला, परिस्थीतीपूढे हतबल झालेला, अस्मिताशून्य बनलेल्या समाजाला वर कसं आणणार, हा प्रश्न प्रत्येक विचारवंताला पडतो. मग समाज परिवर्तनाची चक्र फिरू लागतात. अनेक विचारवंत वित्त अथवा मदतीतून माणसालावर आणण्यचा प्रयत्न करताना दिसतात पण यातून फार मोठे परिवर्तन घडल्याचे दिसून येत नाही अथवा ते मर्यादीत काळापूरता टिकते. तेव्हा समाज परिवर्तन हे त्याचा केंद्र बिंदू असलेल्या माणसाच्या विचार परिवर्तनातून शक्य होऊ शकतं हे ओळखून दादांनी स्वाध्यायातून विचार परिवर्तन घडवले.

   भगवंत केवळ आकाशात नाही, मंदिरात नाही तर माणसा-माणसाच्या ह्रदयात आहे, त्याला जागं केलं की माणसातलं माणूसपण जागृत होईल, या विचाराने श्रीमद्भग्वदगीतेच्या आधारावर त्रिकालसंध्येद्वारे लाखोंच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला. पण हे परिवर्तन दिसतं तितकं सोप नाही. १९४२ पासून सुरू झालेल्या या कार्यच्या सुरवातीच्या काळात दादांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यात सगळ्यात कठीण म्हणजे दादांचे अयाचक व्रत. तरीही केवळ भगवंतावर अनन्य विश्वासाच्या जोरवर निस्वार्थ संबंधातून दादांनी हे परिवर्तन समाजात घडवून आणले.
   आज सरकार अथवा अन्य कोणाच्याही मदतीशिवाय भारतातील हजारोंगावं आदर्श गावं बनली आहेत. अमृतालयम्, मत्स्यगंधा, वृक्षमंदिर या सारख्या प्रयोगातून भारतातील हजारोंगावात बदल घडून आला आहे. हे सर्व करून ही दादांनी स्वत:ला कधी गुरू म्हणवून घेतलं नाही. ते केवळ परिवारातील मोठा भाऊ या नात्याने दादा म्हणूनच सगळ्यांमध्ये फिरले. जागतिक तत्त्वज्ञानाचा अभ्यासक असलेले दादा ख-या अर्थाने अॅक्टिवीस्ट फिलॉसॉफर आहेत. म्हणून दादांच्या प्रति कृतज्ञतेने नमस्कार करण्यासाठी स्वाध्यायी एकत्र येत आहे.
   स्वाध्याय परिवारात दिवाळीसारखे वातावरण आहे. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानंकावर सजावट करण्यात आली आहे. १८ डिसेंबर रोजी मुबई, नवीमुंबई, ठाणे शहर परिसरातील ११ विविध ठिकाणांपासून जवळपास ३,५०० स्कुटर-मोटार बाईक्स यांचे संचलन स्वाध्यायी युवक करणार आहेत. नमस्तुभ्यम् मध्ये ८३००० तरूण नृत्यातून आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. स्वाध्यायी हे नुसतेच नमस्कार करण्यासाठी येत नसून त्यांनी ९० लाखलोकांपर्यंत त्रिकालसंध्येचा विचार पोहचवला आहे, तसेच ११ डिसेंबर रोजी हजारो गावांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे. धनश्री तळवळकर (दीदींच्या) नेतृत्वासहित असा कृतीपूर्ण नमस्कार करून लाखो लोक या स्वाध्याय पंढरीच्या 'पांडुरंगा'ला वंदन करयाला शिस्तबध्द पध्दतीने येऊन कार्यक्रम पार पाडतील यात शंकाच नाही.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या