'बातमी'चा परिणाम...

      काही दिवसांपूर्वी दुचाकी वाहने चोरणा-या टोळ्यांनी नगर जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. याबाबत अधिक अभ्यास केला असता जिल्ह्यात सरासरी दिवसाला २ दुचाकी वाहने चोरीला जातात, असे लक्षात आले.
     दुचाकी वाहन चोरांच्या 'या' टोळ्यांनी पोलिसांपुढे देखील कडवे आव्हान निर्माण केले होते. या टोळ्यांची कार्यपद्धती नेमकी कशी आहे ? तसेच चोरीला गेलेल्या दुचाकी वाहनांचे पुढे काय होते ? याबाबत 'लोकमत'मधून 'प्रकाशझोत' टाकण्यात आला. या अभ्यासपूर्ण वृत्ताची जिल्हा पोलीस प्रमुखांनी गंभीर दखल घेतली आणि 'या' टोळ्या गजाआड करण्यासाठी एक 'विशेष पोलीस पथक' स्थापन केले. परिणामी 'लोकमत'मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर सातव्या दिवशीच पोलिसांच्या विशेष पथकाने एक दुचाकी वाहन चोरांची टोळी गजाआड केली. या टोळीकडून सुमारे १०० हून अधिक दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. यामुळे काही काळापुरते जिल्ह्यातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण कमी झाले होते. 



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या