'लव्ह लेटर'



    आपलं सर्वांचं पहिलं प्रेम 'चिवित्र'च असत.  असं म्हणतात कि ''रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटलि पाहिजे अंतरीची खुण." हि खुण पटते अनेकदा. पण समोरच्याकडे 'प्रेम' व्यक्त करायचं धाडसच होत नाही. कधी कधी असं होत कि आपलं 'प्रेम' जडलंय हे ज्याच्यावर जडलं त्याला कळतही नाही. मग अशा वेळी करायचं. तर त्याला/तिला  'प्रेमपत्र' लिहायचं. अशी अनेक पत्र लिहिली जातात पण ती 'त्या' व्यक्तीला द्यायचं धाडस होत नाही. भीती वाटते कि आपल 'प्रेम' त्या व्यक्तीला कळलच नाही तर...? मग हि पत्र तशीच राहतात.. पण आता हे प्रेम व्यक्त करण्याची संधी 'लोकसत्ता'ने दिलीय.
     अंह...
     हे प्रेम फक्त प्रियकर-प्रेयसी यांच्यातलं नाही. ते कुणाचही असू शकत. असच एका वेड्या मैत्रिणीने (अनामिकेने) आपल्या वेड्या मित्राला लिहिलेलं हे पत्र... खूप आवडलं. अगदी मनापासून. म्हणून तुमच्यासाठी. अगदी जस्सच्या तस्स....

यु आर माय बेस्ट फ्रेंड..!


     प्रिय मित्रा,
     आज पहिल्यांदा तुला पत्र लिहित आहे. (काही नाही. म्हटलं बघू तुला आवडत का ते ?) माहित नाही तुला कधी सांगितलं कि नाही. पण आज मनापासून सांगावसं वाटतंय. तुझ्यासारखा मित्र मिळायला खूप मोठ भाग्य लागतं.
      मला जेंव्हा तुझी गरज होती, तेंव्हा फक्त तूच माझ्यासोबत होतास. जेंव्हा मी खूप दु:खात होते, तेंव्हा केवळ तूच सोबत होतास आणि मला माहितीये यापुढे पण असशील. तेंव्हा मनाने खचलेल्या या मैत्रिणीला तूच आधार दिलास. माझ्या शंभर चुका माफ करण्याचा समजूतदारपणा जर प्रत्येकामध्ये असता तर भांडणे कधी झालीच नसती. (पण माझी या बाबतीत तक्रार आहे. तू माझ्याशी कधीच भांडत नाहीस.) तुझ्यासारखा समजूतदारपणा कोणामध्येच नाही. (उगाचच नाही म्हटल असं, खरंच आहे ते.) तुझ मलाच नाही तर सगळ्यांनाच समजून घेण मला खूप आवडतं. संकटात जसा नेहेमी तूच पाठीशी होतास आणि मी मूर्खपणा केल्यावर जाब विचारायला पण तूच होतास. तसा जाब कधी विचारलाच नाहीस तू. त्याची पण वाट बघत्येय मी. अरे हक्क आहे तो तुझा.
      कदाचित आपण एकत्र असणे काही जणांना रुचणार नाही, तरीदेखील आपण एकत्र राहू. कारण मला इतर मित्र- मैत्रिणी आहेत रे... पण तुझी जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. कधीच नाही. खरंच तू वेगळाच आहेस.
     
     तुझीच मैत्रीण,
     अनामिका.

(हे पत्र आजच्या 'लोकसत्ता'मध्ये प्रसिध्द झालेले आहे.)
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या