फसवीच खरी अंतरे

खर तर 'कविता' हा काही आपला प्रांत नाही.…
पण, बरेचदा 'कविता' खेचून घेतात स्वत:कडे..
अस का व्हावं ?
मग उगाचच आवडलेल्या प्रत्येक कवितेचा जन्म वेदनेतूनच झालाय असा भास होत राहतो.
शब्द दुस-याचे असले तरी सल एकच असल्याचे जाणवते..
'सई'च्या काही कविता अशाच…
'सई'च्या पूर्वपरवानगी शिवाय 'ही' कविता येथे पोस्ट करतोय.
कारण, आत्ता याक्षणी जे वाटतंय, ते व्यक्त होण्यासाठी 'सई'च्या 'या' कवितेशिवाय दुसरे शब्दच नाहीत...
शब्द आणू तरी कोठून ?
म्हणून मूळ कवितेत उगाचच थोडा बदल केलाय.
(या कवितेखाली 'सई'च्या मूळ कवितेचीही लिंक दिली आहे)

'अंतरे'

तुझ्या माझ्यातही आता...
कधीही न संपवता येणार अंतरच निर्माण झालाय...
मी सतत प्रयत्न करतो ते अंतर कमी करण्याचा...
धावत राहतो उगाचच तुझ्या आठवणींच्या मागे...
दुसरा पर्याय आहे का रे आता,
आठवणीं शिवाय ?....
तुलाही अन् मलाही...
पण नाहीच पोहचत तुझ्यापर्यंत....
फसवीच खरी अंतरे....
:
:
:
:
पण,
'अंत' झाला आपला तरी.....
आपल्या दोघांच्याही 'अंत:करणात' कधी...
'अंतरे' निर्माण होतील का ?

('सई'च्या मूळ कवितेची लिंक)
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या