'फेड एक्स्प्रेस' सुसाट


    नुकत्याच झालेल्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत अंडी रॉडीकला तब्बल ५ सेट पर्यंत अटीतटीची झुंज देत टेनिस जगतातील 'फेड एक्स्प्रेस' म्हणून ओळखल्या जाणार्या रॉजर फेडररने विश्वविक्रमी १५ व्या ग्रंड्स्लामला गवसणी घातली. विम्बल्डनच्या इतिहासातला हा एक ऐतिहासिक अन अविस्मरणीय क्षण ठरला...

    नुकत्याच झालेल्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत अंडी रॉडीकला तब्बल ५ सेट पर्यंत अटीतटीची झुंज देत टेनिस जगतातील 'फेड एक्स्प्रेस' म्हणून ओळखल्या जाणार्या रॉजर फेडररने विश्वविक्रमी १५ व्या ग्रंड्स्लामला गवसणी घातली. विम्बल्डनच्या इतिहासातला हा एक ऐतिहासिक अन अविस्मरणीय क्षण ठरला.
     रॉजर फेडररचे हे ६ वे विम्बल्डन अजिंक्यपद आहे. या विजयासोबतच टेनिस जगताच्या सर्वकालीन महान खेळाडू होण्याचा मान फेडररला मिळाला आहे. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अजिंक्यपदाचा प्रबळ दावेदार म्हणून त्याच्याकडे पहिले जात होते. त्यानेही प्रचंड आत्मविश्वासाने स्पर्धेत भाग घेतला होता. उपांत्य सामन्यापर्यंत तर त्याने आपल्या 'फेड एक्स्प्रेस' या नावाला साजेसा खेळ करत अजिंक्यपदाच्या दिशेने सुसाट मार्गक्रमण केले.
    उपांत्य सामन्यात जर्मनीच्या टोमि हास ला सरळ ३ सेटमध्ये हरवून अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तो जम खुश होता. दुसरा उपांत्य सामना अमेरिकेच्या अंडी मरे अन अंडी रॉडीक यांच्यात होता. 'तुला अंतिम सामन्यात यांच्यापैकी कोणाशी खेळायला आवडेल?' असे विचारले असता फेडररने अंडी रॉडीकला पसंती दिली. अंतिम सामन्यात त्याला हरवून विजेतेपदावर हक्क गाजवण्यात मला अधिक आनंद वाटेल असे त्याने सांगितले अन झालेही तसेच.
    विम्बल्डन स्पर्धेचा हा संस्मरणीय आपल्याला 'याची देही याची डोळा' पाहता यावा, म्हणून अनेक सेलिब्रिटींनी मैदानावर हजेरी लावली होती. आपला लाडका सचिनही त्यात होता. एक विक्रमवीर दुसर्या विक्रमवीराचा खेळ डोळ्यात साठवून घेण्यासाठी वेळात वेळ काढून हजेरी लावतो यातच सारे काही आले.
यअ सामन्यात रॉजर फेडरर नव्या विक्रमाला गवसणी घालणार, याची बहुधा आधीच कल्पना आल्याने म्हणा किंवा इतर काही पण माजी विक्रमवीर पीट सम्प्रास, बियोन बोर्ग व जॉन मन्केरो हेही उपस्थित होते. इतकेच नाही तर हॉलीवूडचा सुपरस्टार व 'ग्ल्याडीएतर' फेम रसेल क्रो देखील आला होता. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली तेंव्हा समालोचन करणाऱ्या विजय अमृतराज यांनी मैदानावर दोन ग्ल्याडीएटर असल्याचे सांगितले. तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण एक मैदानात अन दुसरा प्रेक्षकात असल्याचे त्याने सांगताच सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दोघांना अभिवादन केले.
    अशा प्रकारे विक्रमवीर झाल्यानंतरही काहींनी सचिन सारखेच त्यालाही 'आता निवृत्ती कधी?' असे विचारण्याचे धाडस केलेच. त्यांना तितक्याच शांतपणे 'छे ! अजून बराच वेळ आहे...!' असे म्हणत त्याने गप्प केले. त्याची एक्स्प्रेस अशीच सुसाट धावत राहो, टेनिस जगतातल्या या खर्याखुर्या जगज्जेत्याला त्याच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,!
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या